Sunday, October 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दुष्काळाच्या छायेत उत्तर सोलापूरचा ‘मायक्रो प्लॅन’

तरुण भारतbyतरुण भारत
September 1, 2026
in solapur
0
दुष्काळाच्या छायेत उत्तर सोलापूरचा ‘मायक्रो प्लॅन’
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – उत्तर सोलापूर तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी गावनिहाय ‘मायक्रो प्लॅनिंग’ करून पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर पंचायत समितीने भर दिला आहे. नागरिकांसह शाळा आणि अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी उपलब्ध निधीतून आवश्यक कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हा परिषद सदस्य डॉ. पृथ्वीराज माने यांनी दिल्या.
केंद्र शासनाच्या २०२६-२७ या वर्षासाठी पंचायत समितीस्तरीय विकास आराखडा तयार करून त्यास मंजुरी देण्यासाठी आयोजित बैठकीत डॉ. माने बोलत होते. सभापती तेजस्विनी बोराडे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य चेताली मुळे, उपसभापती सुनील भोसले, सदस्य सुनीता बारसकर, ऋतुजा बंडगर, वैशाली शीलवंत, धनाजी भोसले, गटविकास अधिकारी राजाराम बोंग, विस्तार अधिकारी सोमनाथ शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन गावनिहाय नियोजन करण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. तालुका क्षेत्रफळाने लहान असल्याने पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर मर्यादित निधी उपलब्ध होतो. त्यामुळे उपलब्ध निधीचा परिणामकारक वापर करून पिण्याच्या पाण्याच्या योजना, हातपंप दुरुस्ती व नव्याने बसविणे, आवश्यक पाईपलाईन तसेच इतर पाणीपुरवठा कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा, अशी सूचना करण्यात आली.
दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम शाळा व अंगणवाड्यांवर होऊ नये, यासाठी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था तपासण्याचे निर्देशही देण्यात आले. तसेच अंगणवाडी, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांवर सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मागवून त्याची अचूक माहिती तयार करावी, असे डॉ. माने यांनी सांगितले.
बैठकीत पाणीपुरवठा, कृषी, महिला व बालकल्याण आणि शिक्षण विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. गावनिहाय पाणीस्थिती, आवश्यक कामे आणि निधीची गरज याबाबत माहिती संकलित करून त्यानुसार आराखडा तयार करण्याचे ठरले. प्रस्ताव तयार करताना शासनाचे निकष, कामांची गरज आणि उपलब्ध निधी यांचा समन्वय साधून वेळेच्या मर्यादेत आराखडा अंतिम करावा, यावरही बैठकीत भर देण्यात आला.
गावनिहाय माहिती व अहवाल संकलित करून पिण्याच्या पाण्याशी संबंधित कामांना अग्रक्रम देण्यात येईल, असे गटविकास अधिकारी राजाराम बोंग व विस्तार अधिकारी सोमनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
Post Views: 63
Previous Post

प्रांजली लावंड , मधुरा चांदणे, सायुज्जा पुंडे, समाजदीप पुरस्काराने सन्मानित

Next Post

शेतकरी, दूध उत्पादकांच्या वाढत्या अर्जांमुळे सेस निधीत दीड कोटींची वाढ

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शेतकरी, दूध उत्पादकांच्या वाढत्या अर्जांमुळे सेस निधीत दीड कोटींची वाढ

ताज्या बातम्या

तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेकडून महाप्रसाद

तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेकडून महाप्रसाद

October 24, 2026
पायी जाणाऱ्या भाविकांना औषधोपचार, पिण्याचे पाणी, चहा व बिस्किटांचे वाटप

पायी जाणाऱ्या भाविकांना औषधोपचार, पिण्याचे पाणी, चहा व बिस्किटांचे वाटप

October 24, 2026
श्री तुळजा भवानी मातेच्या दर्शनास जाणार्‍या भाविकांना प्रसाद वाटप

श्री तुळजा भवानी मातेच्या दर्शनास जाणार्‍या भाविकांना प्रसाद वाटप

October 24, 2026
४२ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

४२ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

October 24, 2026

चला, एकत्र येऊया — पोलिओमुक्त भारत घडवूया!

October 24, 2026

आता गुरुजींचीही ऑनलाइन हजेरी; उशीर झाल्यास ‘लेट मार्क’!

October 24, 2026
लायन्स क्लब बार्शी टाऊन आयोजित पीस पोस्टर स्पर्धेला  उत्तम प्रतिसाद

लायन्स क्लब बार्शी टाऊन आयोजित पीस पोस्टर स्पर्धेला  उत्तम प्रतिसाद

October 24, 2026

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा, ७० हजाराच्या मोबाईलसहित पर्स महिलेला परत

October 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1406757

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!