सोलापूर – १५ वर्षाखालील गटाच्या जिल्हा खुली व मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू श्रेयस कुदळे याने सात गुणांसह व मुलींच्या गटात बार्शीच्या शालेय राष्ट्रीय पदक विजेत्या सान्वी गोरे हिने सहा पैकी सहा गुणांसह उत्कृष्ट खेळाच्या जोरावर विजेतेपद प्राप्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे संचलित कै. विलासचंद्र मोतीचंद मेहता माध्यमिक शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त चॅम्प चेस स्कूल व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेत विविध वयोगटात मुलांमध्ये पंढरपूरच्या नचिकेत तोंडले, अकलूजच्या कृष्णराज पटाले सोलापुरची ईशा पटवर्धन बार्शीची ज्ञानदा सांगुळे यांनी आकर्षक खेळ करत अनुक्रमे ११ व ८ वर्षांखालील गटांचे जेतेपद मिळविले.
मुलांच्या गटात श्रेयस कुदळे, श्रेयस इंगळे व अधिराज म्हेत्रे व यांचे आठ पैकी प्रत्येकी सात गुण झाल्यामुळे टायब्रेकमध्ये बोकोल्स गुणपद्धतीवर अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक प्राप्त झाला. तर देवदत्त पटवर्धन याने साडेसहा गुणांसह चौथा क्रमांक पटकावित जिल्हा संघातील स्थान निश्चित केले. मुलींच्या गटात अनन्या उलभगत हिने पाच गुणांसह द्वितीय तर प्रतीक्षा चाबुकस्वार व पृथा ठोंबरे यांनी साडेचार गुणांसह तिसरा व चौथा क्रमांक पटकाविला. प्रथम आलेल्या चौघींचीही निवड सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
स्पर्धेत प्रमुख पंच वरिष्ठ राष्ट्रीय बुद्धिबळ पंच उदय वगरे, रोहिणी तुम्मा-राठी, प्रशांत पिसे, विजय पंगुडवाले, प्रज्वल कोरे, यश इंगळे, चंद्रशेखर बसरगीकर आदींनी यशस्वीरीत्या काम पहिले.
विजेत्या खेळाडूंचे वि. मो. मेहता माध्यमिक शाळेचे नियामक मंडळ सदस्य सुरेशबाबु मंकणी व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रुती बागेवाडी, क्रीडा शिक्षक अमित कोर्टीकर तसेच सोलापुर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, सोलापूर चेस अकॅडमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर, सुमुख गायकवाड, अतुल कुलकर्णी, संतोष पाटील आदींनी अभिनंदन केले.
*अंतिम निकाल (अनुक्रमे १ ते ५ क्रमांक, गुण व बोकोल्स गुणांसह):*
१५ वर्षे (खुला): श्रेयस कुदळे-७ (४२.५), श्रेयस इंगळे- ७ (४१.५),अधिराज म्हेत्रे-७ (३६.५),देवदत्त पटवर्धन-६.५ (४०), आयुष जानगवळी-६.५ (३४.५),आयुष गायकवाड-६ (४४),हर्ष हलमल्ली-६ (४२),प्रणव मजगे-६ (४०.५),विहान राठोड ६ (३९.५),वेदांत मुसळे-६ (३६.५)
११ वर्षे (मुले): नचिकेत तोंडले-६ (३९.५),प्रतीक हलमल्ली-६ (३७),विवान दासरी-६ (३५),नैतिक होटकर-५.५ (३९.५), श्लोक चौधरी-५.५ (३९)
८ वर्षे मुले: कृष्णराज पटाले-५.५,आयुष बदवने-३, ५ (३७.५),ओम सारवाडकर-५ (३२),जय राठी-५ (३०.५), प्रत्युष पाटील-४ (३३)
१५ वर्षे मुली: सान्वी गोरे-६, अनन्या उलभगत-५, प्रतीक्षा चाबुकस्वार-४.५ (२३), पृथा ठोंबरे-४.५ (२२.५), सृष्टी तोंडले-४.५ (२२), अदिती इनानी-४.५ (१७.५), फराह शेख-४.५ (१७), पलक टकले-४ (२२), संस्कृती लव्हळे-४ (१८),आरोही दलाल-४ (१७.५)
११ वर्षे मुली: ईशा पटवर्धन-४ (१९.५), श्रेया मादगुंडी-४ (१८), संस्कृती जाधव-४(१७.५),ओजस्वी बोराळे-३.५,स्वराली बिराजदार-३(१८.५)
८ वर्षे मुली: ज्ञानदा सांगुळे-३ (१९),अधिरा रोकडे-३ (१७.५), श्रुती भारती-२.५,वेदिका मादगुंडी-२ (१७.५),हिंदवी मोरे-२ (१६.५).
Post Views: 6