सांगोला – महाविद्यालयात प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक शिक्षण विभागांतर्गत हॉकीचे जादूगार पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात आली. या निमित्ताने प्राध्यापक व विद्यार्थी खेळाडू यांच्या दरम्यान क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ.सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ.जगदीश चेडे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. यावेळी प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.