बार्शी – जनता सहकारी बँक लि, धाराशिव शाखा बार्शी या शाखेच्या घोडे गल्ली येथील स्वमालकीची इमारत जीर्ण झाल्याने नवीन इमारतीचे बांधकाम पुर्ण होईपर्यंत आज मंगळवार दि. १ सप्टेंबर रोजी पासून शाखेचा दैनंदिन व्यवहार एम.पी. कॉम्प्लेक्स, आगळगाव रोड, हिरेमठ हॉस्पिटलसमोर, बार्शी या नवीन स्थलांतरित जागेत बँकेचे ज्येष्ठ महिला ठेवीदार सौ. लता तुकाराम लंगडे व श्रीमती मीनाक्षी मोहनराव राऊत यांचे हस्ते रिबीन कापून नूतन जागेत शाखेचे कामकाज चालू करण्यात आले. तसेच याप्रसंगी ठेवीदारांचा सन्मान करण्यात आले. या समयी बँकेचे अध्यक्ष श्री. वसंत सांभाजीराव नागदे व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच बँकेचे सभासद ठेवीदार, कर्जदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Post Views: 12