सोलापूर : संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी भव्य महिला दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता हॉटेल वैष्णवी प्रांगण, जुळे सोलापूर येथे उत्साहात पार पडणार आहे.
महिलांच्या सहभागाचा उत्सव, परंपरा-संस्कृती आणि एकतेचा संगम या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडी फोडण्याच्या साहसी उपक्रमासोबतच महिलांचा उत्साह, जल्लोष आणि सांघिक सहभाग हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. सहभागी महिलांसाठी आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापुरातील महिला, सामाजिक कार्यकर्त्या आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महिला दहीहंडी उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

















