माळशिरस – एन सी एम सी कार्ड च्या तांत्रिक अडचणीमुळे महिलाप्रवासी व ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण तिकीट घेेण्याची वेळ आली असून परिवहन विभागाने सर्व तांत्रिक अडचणी दूर होई पर्यंत वाहकाकडील मशीन मधील अर्ध तिकीट सुविधा सुरू ठेवावी अशी मागणी महिला व ज्येष्ठ नागरिकांतून होत आहे.
महिला प्रवाशांकडे व ज्येष्ठ नागरीकडे एन सी एम सी कार्ड व कार्ड वरती बॅलन्स असूनही वाहकाकडील मशीन मध्ये दाखवत नसल्याने वाहक व प्रवाशां मध्ये वाद होत आहे.त्याच बरोबर वाहकाकडून बॅलन्स करताना बॅलन्स होत नाही त्यामुळे प्रवाशांची गैर सोय होत असून पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे.आज सकाळी फलटण अक्कलकोट बस मध्ये महिला वाहक व ज्येष्ठ नागरिक यांच्यात वाद झाला ज्येष्ठ नागरिकांकडे बॅलन्स केल्याची पावती होती तर वाहकाने अनेक वेळा कार्ड मशीन वर चेक केले तर नो डाटा फाउंड असे दाखवत होते.वाचकांनी बस माळशिरस पोलिस ठाण्यात नेली परंतु या तांत्रिक बाबीत पोलिस काय करणार .वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून पूर्ण तिकीट घेतले व बस मार्गस्त झाली.
एन सी एम सी कार्डला बॅलन्स होत नसल्याने प्रवास करणे कठीण झाले असून वाहकाकडील अर्ध तिकीट सुविधा तांत्रिक अडचणी दूर होई पर्यंत सुरू ठेवावी
तानाजी कारंडे. प्रवाशी
एन सी एम सी कार्ड बाबत तांत्रिक अडचणी आहेत याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना कळविण्यात आले आहे. वरिष्ठ पातळीवरून वाहकाकडीक अर्ध तिकीट पर्याय काढण्यात आला आहे
संजय भोसले. डी टी ओ.सोलापूर
चर्चा करून तिकीट घेतले पैसे परतण्यासाठी तक्रार करावी
वाहक…नेवसे फलटण अक्कलकोट बस
Post Views: 11