सोलापूरः सम्राट अशोक युवक मंडळ संचलित सम्राट अशोक बालक मंदिर, सम्राट अशोक मराठी विद्यालय, यशोधरा प्रशाला व यशोधरा ज्युनियर कॉलेज, यशोधरा शिशु अध्यापिका विद्यालय, सोलापूर येथे ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक रमेश सुतकर, प्रमुख पाहूणे आयु. राजा सरवदे, ॲड. सिराज अब्दुल रजाक शेख, के. डी कांबळे, सुबोध वाघमोडे, सुग्रीव जेटीथोर, सुबोध सुतकर, माजी विद्यार्थीनी अंजली सरवदे, डॉ. पंकज सुतकर, सुवर्णा भांगे या मान्यवरांच्या हस्ते ज्ञानज्योती साविञीबाई फुले व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
सर्व शिक्षकांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष- रमेश सुतकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच मा. आयु. राजाभाऊ सरवदे यांनी संस्थेचे कौतुक करुन शिक्षक दिनाचे महत्त्व स्पष्ट केले डॉ. पंकज सुतकर इत्यादी शिक्षकांनी शिक्षक दिनानिमित्त आपले मत मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुबोध सुतकर यानी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धनश्री कस्तुरे व सुभद्रा अंकुशराव तर आभार प्रदर्शन सुधीर वाघ यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष रमेश सुतकर, संस्थेचा सचिवा विमल सुतकर यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.


















