शिबिरामध्ये डॉ. केदार करपे, डॉ. शार्दूल कुलकर्णी, डॉ. मुक्तेश्वर शेटे आणि डॉ. सुशांत वागज यांनी नागरिकांची तपासणी करून त्यांना मोफत वैद्यकीय सल्ला दिला. यावेळी नागरिकांची मोफत मधुमेह तपासणी व ईसीजी करण्यात आली. तसेच मधुमेह व इतर जीवनशैलीशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण, ताणतणाव व्यवस्थापन, नियमित आरोग्य तपासणी आणि दैनंदिन जीवनशैलीत आवश्यक बदल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमास हॉस्पिटलचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य डॉ. राजेंद्र घुली, संजय पटेल आणि कल्पेश झवेरी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. ज्ञानेश्वर सोडल आणि डॉ. अभिजीत जिरगे यांच्या समन्वयातून शिबिराचे आयोजन यशस्वीपणे करण्यात आले.
नागरिकांमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि आजारांचे लवकर निदान होऊन योग्य उपचार मिळवून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. नागरिकांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत हॉस्पिटलच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.

















