Monday, September 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

 मराठा आरक्षणावर पक्षांची भूमिका जाहीर करा!

तरुण भारतbyतरुण भारत
September 7, 2026
in marathwada
0
 मराठा आरक्षणावर पक्षांची भूमिका जाहीर करा!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

जालना  : मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक संवेदनशील आणि गुंतागुंतीचा होत असताना आमदारांनी आपल्या मतदारसंघातील राजकीय समीकरणांचा विचार करून वैयक्तिक भूमिका मांडण्यापेक्षा राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनीच या प्रश्नावर आपली अधिकृत आणि स्पष्ट भूमिका महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाहीर करावी, असे खुले आवाहन भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश सरचिटणीस तथा आमदार संजय कुटे यांनी केले. जालना येथील छत्रपती व्ही. के. फाउंडेशन आणि छावा महाराष्ट्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‌‘सकल मराठा संवाद मेळाव्यात‌’ ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. मेळाव्याला मराठा समाजातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी कुटे यांनी मराठा आरक्षणाच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना सरकार आणि आंदोलनकर्ते या दोन्ही बाजूंच्या भूमिकांवर प्रश्न उपस्थित केले.आमदार कुटे म्हणाले की, मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत क्लिष्ट झाला असून, त्यावर स्पष्ट भूमिका घेण्यास अनेकजण टाळाटाळ करीत आहेत. काही आमदार पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्याऐवजी आपल्या मतदारसंघातील जातीय समीकरणांचा विचार करून भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्या मतदारसंघात मराठा मतदारांचे प्राबल्य आहे, तेथे मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली जाते; तर ओबीसी मतदारांची संख्या अधिक असलेल्या मतदारसंघात त्याच मागणीला विरोध केला जातो. अशा परस्परविरोधी भूमिकांमुळे समाजात संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.मराठा आरक्षणाच्या तांत्रिक मुद्द्यांवर भाष्य करताना कुटे यांनी राज्यात सापडल्याचे सांगितल्या जाणाऱ्या 54 लाख कुणबी नोंदींच्या चर्चेवरही प्रश्न उपस्थित केला. या नोंदी नवीन नसून विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात त्या पूर्वापार अस्तित्वात असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्याच्या संदर्भात सुमारे 26 हजार कुणबी नोंदी सापडल्याचे त्यांनी नमूद केले. आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी ‌‘हैदराबाद गॅझेट‌’च्या आधारे आरक्षण देण्याची आहे. मात्र, या आधारे अद्याप प्रशासनाकडून एकही कुणबी प्रमाणपत्र जारी झालेले नसल्याचा दावा आमदार कुटे यांनी केला. त्यामुळे सरकार आणि आंदोलनकर्ते या दोघांनीही आरक्षणाच्या तांत्रिक व कायदेशीर बाबींवर स्पष्ट भूमिका जनतेसमोर मांडणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या संवाद मेळाव्यास आमदार नारायण कुचे, मनपाचे उपमहापौर राजेश राऊत, नगरसेवक भास्कर दानवे, माजी उपनगराध्यक्ष सुनील आर्दड, ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, सभापती सौ संध्या देठे, विभावरी ताकट, संस्थापक कोषाध्यक्ष संभाजी ब्रिगेड संतोष गाजरे, जिल्हाध्यक्ष भागवत काळे उपाध्यक्ष नामदेव काळे, तालुकाध्यक्ष उद्धवराव गुळमकर राजाभाऊ गुलगे, गणपत जाधव शिवसेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सोनवणे यांच्यासह समाजबांधव व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख युवा नेते सुनील बापू आर्दड, ज्योतीराम माने  व प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक विष्णू कदम यांनी केले. यावेळी विविध मान्यवर तसेच पत्रकारांचा विशेष सत्कार करण्यात आला. पत्रकार परिषद जालनाचे अध्यक्ष अंकुश आप्पा देशमुख, व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष राजेश भालेराव, प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष दीपक शेळके, संपादक भरत मानकर, संतोष भुतेकर, अर्पण गोयल, अंकुश गायकवाड, उपसंपादक संजय शेलकर, रवि शिंदे, संपादक विकास बागडी, भगवान साबळे, संदीप भाकरे, बंडू सुरडकर, सुशील कुमार वीठोरे, अमीर खान, संजय उनगे, अविशास कवळे, शेख नुर, सुनिल नरवडे, हुसेन कादरी आदी पत्रकार उपस्थिती होते.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राजकीय पक्षांनी आता केवळ आश्वासने किंवा मतदारसंघनिहाय भूमिका न घेता आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, या आमदार संजय कुटे यांच्या आवाहनामुळे जालन्यातील या संवाद मेळाव्याला राजकीयदृष्ट्याही महत्त्व प्राप्त झाले.

Post Views: 9
Previous Post

विकासकामांबरोबरच मतदानाचाही हक्क बजावण्याची आवश्यकता

Next Post

माळी महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी शंकरराव वाघमारे तर निशिगंधा माळी यांची महिला आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
माळी महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी शंकरराव वाघमारे तर निशिगंधा माळी यांची महिला आघाडीच्या अध्यक्षपदी  नियुक्ती

माळी महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी शंकरराव वाघमारे तर निशिगंधा माळी यांची महिला आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

ताज्या बातम्या

सांगोला महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

सांगोला महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक 

सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक 

September 7, 2026
‘शेतकरी उतरले रस्त्यावर’ राज्यात दुष्काळ जाहीर करून वगळलेले ट्रिगर पुन्हा घ्या -शंकर गायकवाड

‘शेतकरी उतरले रस्त्यावर’ राज्यात दुष्काळ जाहीर करून वगळलेले ट्रिगर पुन्हा घ्या -शंकर गायकवाड

September 7, 2026
शिक्षकांनी ज्ञान, विचार व कृतीतून समाजासमोर आदर्श निर्माण करावा- नानासाहेब लिगाडे

शिक्षकांनी ज्ञान, विचार व कृतीतून समाजासमोर आदर्श निर्माण करावा- नानासाहेब लिगाडे

September 7, 2026
चपळगांवच्या रिनाती इंग्लिश स्कूलची  मैदानी स्पर्धेत 6 पदकांची कमाई

चपळगांवच्या रिनाती इंग्लिश स्कूलची  मैदानी स्पर्धेत 6 पदकांची कमाई

September 7, 2026
प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेतर्फे ११ उपक्रमशील शिक्षकांचा गौरव

प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेतर्फे ११ उपक्रमशील शिक्षकांचा गौरव

September 7, 2026
सज्जनांच्या परिपालनाकरता व दुष्टांच्या विनाशाकरीता विविध रुपातून भगवंत अवतार घेतात – ह.भ.प.शाहू महाराज माने

सज्जनांच्या परिपालनाकरता व दुष्टांच्या विनाशाकरीता विविध रुपातून भगवंत अवतार घेतात – ह.भ.प.शाहू महाराज माने

September 7, 2026

अन्नछत्र मंडळ येथे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा

September 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1171774

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!