मोहोळ : माळी महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी मोहोळ चे शंकरराव वाघमारे यांची तर डॉ. निशिगंधा माळी यांची महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी तर भारत माळी यांची राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.*
नागपूर येथील माळी महासंघाच्या कार्यालयातून माळी महासंघाची राष्ट्रीय कार्यकारिणी काल रात्री जाहीर करण्यात आली असून, सोलापूर जिल्ह्यातील माळी समाजातील प्रमुख मान्यवरांना राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. माळी महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी सोलापूर जिल्हा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्री शंकरराव वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख श्री. रवींद्र अंबाडकर यांनी राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अविनाश भाऊ ठाकरे यांच्या संमतीने ही निवड जाहीर केली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ.सौ. निशिगंधा माळी यांची माळी महासंघाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. श्री भारत माळी यांच्यावर राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
याशिवाय माळीनगर साखर कारखान्यांचे चेअरमन रंजन भाऊ गिरमे आणि सांगोल्याचे माजी नगराध्यक्ष डॉ. प्रभाकर माळी यांची महासंघाच्या सल्लागारपदी निवड जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी कार्यकारिणी मधे महासचिव म्हणून रवींद्र अंबाडकर, सौ. वनिता ताई लोंढे तर राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी सोलापूर चे शंकरराव वाघमारे, पिंपरी चिंचवड चे संतोष लोंढे, वर्धा येथील रोहिणी पाटील , चंद्रपूर चे नामदेव काकोडे, संभाजी नगर चे शांताराम गाडेकर, पुणे येथील स्नेहल बाळसराफ, तर सचिव पदी नाशिक चे सुनील मोरे , पंढरपूर चे भारत माळी, जालना चे संतोष जमधडे, संभाजीनगरच्या संगीता पवार , अमरावती चे संजय बोराडे , नंदुरबार चे अविनाश माळी , नाशिक च्या संगीता जाधव , नागपूर च्या वर्षा गोडे, मोडनिंब सोलापूर येथील निशा कोल्हे माळी यांची महिला आघाडी च्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड जाहीर करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळी समाजातील प्रमुख मान्यवरांना माळी महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वपूर्ण स्थान मिळाल्याने समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडीबद्दल जिल्ह्यातील विविध भागांतून समाज बांधवांकडून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्याचा तसेच माळी समाजाचा राष्ट्रीय स्तरावरचा सहभाग अधिक बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास समाजबांधवांनी व्यक्त केला आहे.
Post Views: 5