सांगोला – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी सातत्याने केलेले मार्गदर्शन आणि प्रयत्न महत्त्वपूर्ण असतात. शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान देणारे मार्गदर्शक नसून राष्ट्राच्या जडणघडणीतील महत्त्वाचे शिल्पकार असल्याचे मत संस्था उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर यांनी व्यक्त केले. ते फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.तानाजी बुरुंगले, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस यांच्यासह कॅम्पसमधील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी डाॅ.राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून भाऊसाहेब रूपनर यांच्या हस्ते शिक्षकांना येथे राष्ट्र घडते हे पुस्तक भेट देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहन लिगाडे, स्वप्नील रूपनर, नेताजी मस्के यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 11