मंगळवेढा – तालुक्यातील मल्लेवाडी गावच्या शिवारात शुक्रवार, १० जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता एका अज्ञात वाहनाने अज्ञात महिलेला धडक देऊन ठार केल्याची घटना घडली. अपघातानंतर चालकाने जखमी महिलेला उपचारासाठी दवाखान्यात नेले नाही आणि पोलीस ठाण्याला माहितीही दिली नाही; तो फरार झाला.
पोलीस पाटील आनंदा आप्पासो रायबान (वय ४०, रा. मल्लेवाडी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ५५ ते ६० वयोगटातील अज्ञात महिला मंगळवेढा-पंढरपूर रस्त्यावर हणुमंत रणदिवे यांच्या घरासमोरून जात असताना अज्ञात चालकाने भरधाव वेगात व हयगईने वाहन चालवून जोराची धडक दिली. यामध्ये महिला गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १०६(१), १२५(अ), १२५(ब) तसेच मोटर वाहन कायद्यातील कलम १८४, १३४(अ-ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा क्र. ८१३/२०२६ नोंदवून पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे (क्र. १०५४) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
मृत महिला कोणती, तिचे नाव-गाव काय, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Post Views: 15