बार्शी – बार्शी शहरातील परांडा चौक परिसरातील एका बाइंडिंग वर्कशॉपच्या गोदामातून लाखो रुपयांची कॉपर वायर चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा बार्शी शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी ३ आरोपींना बेड्या ठोकल्या अजून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप गाडी असा एकूण ५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.
तक्रारदार श्री. पप्पू श्रीमंत रगडे (वय ३५ वर्षे, रा. उपळाई, ता. बार्शी) यांचे परांडा चौक, बार्शी येथे वाइंडिंग वर्कशॉपचे गोदाम आहे. दि. १२ जून ते दि. १३ जून २०२६ च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोदामाचे शटर उपटून आतील १,९३,८००/- रुपये किमतीचे २०५ किलो वजनाचे ५ कॉपर वायरचे बंडल चोरुन नेले होते. याप्रकरणी तक्रारदाराच्या फिर्यादीवरुन बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३६३/२०२६ बी.एन.एम. (BNS) कलम ३०३(२), ५५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. सदर गुन्हाच्या तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कोल्हापूर परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेले आरोपी- १) सागर आकाराम गोसावी (वय ५१ वर्षे, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर, जि. कोल्हापूर), २) हणमंत राजाराम सपोनिसी (वय ५० वर्षे, रा. त्रिबोली मंदिर, टेबलाई नाका, कोल्हापूर) ३) दुर्गाच्या रामाच्या कल्याणी (वय ५८ वर्षे, रा. त्रिबोली मंदिर, टेबलाई नाका, कोल्हापूर). या गुन्ह्यातील चौथा साथीदार मंजूनाथ (रा. टेबलाई नाका, कोल्हापूर) हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
जमा केलेला मुद्देमाल व वाहन- कॉपर वायर बंडल- १,१३,८००/- रुपये किमतीचे २०४ किलो वजनाचे ५ कॉपर वायर बंडल (संपूर्ण चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत), गुन्ह्यात वापरलेले वाहनः ५,००,०००/- रुपये किमतीची बोलेरो पिकअप गाडी (क्र. MH 10 BR 1411). वायर कापण्याचे कटर व इतर साहित्य (अंदाजे रु. ५,०००/-).
अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी व तपासासाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही टोळी आंतरजिल्हा/आंतरराज्यीय गुन्हेगारीशी संबंधित असण्याचा संशय असून, त्यांनी अशा प्रकारचे इतर काही गुन्हे केले आहेत का, याचा सखोल तपास बार्शी शहर पोलीस करत आहे.
सदरची कामगिरी श्री. अतुल कुलकर्णी (पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण), श्री. विजय कबाडे (अप्पर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण) व श्री. सुहास जगताप (उपविभागीय पोलीस अधिकारी, बार्शीीं) यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. गणेश कुंभार यांच्या नेतृत्वात पोसई अभय बाकणे, पोहेको प्रवीण साठे, पोहेको. सुनील बनसोडे, मपोहेको कोतवाल, सचिन नितनात, अविनाश पवार, राहुल उदार, अंकुश जाधव, सचिन देशमुख, अजिज शेख, दत्ता सोमवाड, प्रल्हाद अकुलवार, सतीश उपडे, सचिन राऊत, संतोष जाधवर, धनराज फत्तेपूरे, लक्ष्मण शेळके, राहूल सोनकर लायबर पोलीस ठाणे यांनी पार पाडली आहे.
Post Views: 12