मोहोळ – रस्ता ही विकासवाहिनी आहे . ग्रामीण भागात चांगले रस्ते झाले म्हणजे खासकरुन शेतकरी, विद्यार्थ्यी, आणि महिलांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळते. जि.प. सदस्या बालाजी नरुटे यांच्या प्रयत्नामुळे हा रस्ता मंजूर झाला. आता त्यामुळे या भागाच्या विकासाला गती येईल. असे प्रतिपादन लोकनेते शुगर इंडस्ट्रीज चे चेअरमन विक्रांत तथा बाळराजे पाटील यांनी केले . पोखरापूर गांव ते धनजीविठोबा आणि पुढे आढेगांव या रस्त्याच्या कामाचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सौ. सानिका नरुटे या होत्या.यावेळी बोलताना बाळराजे पाटील यांनी जि प सदस्य बालाजी नरूटे यांचे खास अभिनंदन केले . त्यांच्या अथक प्रयत्नामुळे हा निधी मिळाला असून अशाच पद्धतीने आपला सदस्य असेल तर अधिक निधी मिळून आपल्या प्रभागाचा, आपल्या जिल्हा परिषद गटाचा विकास करण्यासाठी त्याची मदत होते असेही त्यांनी सांगितले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...























