सांगोला – फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी, सांगोला येथील बी.फार्मसी तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या ४३ विद्यार्थ्यांनी दमण येथील युनिक फार्मास्युटिकल लॅबोरेटरी येथे औद्योगिक भेट देत औषधनिर्मिती उद्योगाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी औषधनिर्मिती प्रक्रियेतील विविध टप्पे, उत्पादन विभागाची कार्यपद्धती, गुणवत्ता नियंत्रण, गुणवत्ता हमी, पॅकेजिंग, साठवणूक तसेच औद्योगिक सुरक्षा याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच गुणवत्ता हीच औषधनिर्मितीची ओळख या दृष्टिकोनातून औषधनिर्मिती उद्योगात चांगल्या उत्पादन पद्धती, गुणवत्ता मानके, दस्तऐवजीकरण आणि सुरक्षितता नियमांचे असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. हि औद्योगिक भेट यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डाॅ.संजय बैस यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.नाहिद शेख, प्रा.रेवती चिलका आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 11