सोलापूर – हजूर साहेब नांदेड आणि सावंतवाडी रोड दरम्यान धावणाऱ्या गणपती विशेष रेल्वेगाड्यांच्या (गाडी क्रमांक ०७६५९/०७६६०) ४ फेऱ्यांसाठी, येडशी आणि बार्शी टाउन स्थानकांदरम्यान असलेल्या धाराशिव स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे.
या विशेष रेल्वेगाड्यांच्या इतर तपशीलांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. प्रवाशांनी कृपया या बदलांची नोंद घ्यावी आणि या वर्षीच्या गणपती उत्सवाच्या काळात या अतिरिक्त थांब्याच्या सुविधेचा लाभ घ्यावा.
या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा RailOne अथवा NTES ॲप डाउनलोड करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनच्यावतीने करण्यात आले आहे.




















