सांगोला – महाविद्यालयातील संख्याशास्त्र विभागातील प्रा.ऋतुजा बाबर यांनी विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या संख्याशास्त्र या विषयातून यु.जी.सी नेट परीक्षेत यश प्राप्त केले. या यशाबद्दल प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष तात्यासाहेब केदार व प्रा.पी.सी.झपके, सचिव ऍड.उदयबापू घोंगडे, सहसचिव साहेबराव ढेकळे, खजिनदार नागेश गुळमिरे यांनी प्रा.ऋतुजा बाबर यांचे अभिनंदन केले.