सोलापूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही विजापूर रोड येथील मनोरमा पावन गणपती मंडळाची बैठक मनोरमा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (ता.५) सायंकाळी पार पडली. या बैठकीत यंदाच्या वर्षी मनोरमा पावन गणपती मंडळाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत प्रभाकर येमलवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यंदा या मंडळाचे २९ वे वर्ष आहे.सन २०२६ -२७ यावर्षीची कार्यकारिणी याप्रमाणे – मार्गदर्शक – मा. श्रीकांत मोरे (चेअरमन, मनोरमा बँक) सौ. शोभा मोरे (चेअरमन, मनोरमा मल्टिस्टेट, सोलापूर), डॉ. सुमित मोरे, डॉ. मिताली मोरे, डॉ. ऋचा मोरे- पाटील, डॉ. आदित्य पाटील. अध्यक्ष – चंद्रकांत प्रभाकर येमलवार, उपाध्यक्ष – सौ. रुपाली काळुंगे, कार्याध्यक्ष – सौ. शिल्पा कुलकर्णी, नीलकंठ करंडे, खजिनदार – पुरुषोत्तम साखरे, सचिव – शिवशंकर सावंत, सहसचिव – मोरेश्वर आवताडे, पूजाप्रमुख – सुनील पाटील, दीपक सुरवसे, बसलिंगप्पा धमगुंडे, राचप्पा कटारे, मल्लिकार्जुन मड्डे, अरुंधती नायडू, अॅड. दीपा भोसले, सौ. संगीता मोरे, सौ. नयना भोसले, सौ. अंजली मोरे, सौ. संगीता करपे, नितीन भोसले, नेताजी मोरे तर सदस्य म्हणून शिवाजी शितोळे, प्रशांत गोरे, नंदकिशोर ताकभाते, अक्षय उंबरगीकर, केवल पांढरे, बाबासाहेब आवताडे, नागेश पवार, अनिष कुलकर्णी आदींची निवड करण्यात आली. यावेळी मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.