श्रीपूर – सद्य स्थितीत मेडिकल क्षेत्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान येत आहे . व्यायामाने शरीर बळकट करता येते परंतू अनेक विकारांमध्ये फिजिओथेरपी मुळे शारीरीक वेदनां कमी करणे सुसह्य झाले असल्याचे प्रतिपादन कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सरकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी यांनी केले .
श्रीपूर येथिल प्रतिथयश डॉ. सुधीर पोफळे व डॉ . आरती पोफळे यांच्या श्रीयश हॉस्पीटल मध्ये फिजिओथेरपी सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते .
पुढे बोलताता डॉ . कुलकर्णी म्हणाले की ग्रामीण भाग असूनही डॉ . सुधीर पोफळे यांच्या माध्यमातून उत्तम वैद्यकिय सेवा या भागात उपलब्ध होत आहेत ही फार महत्वाची बाब आहे .
याप्रसंगी प्रथम धन्वंतरीमातेचे पुजन व दीपप्रज्क दीपप्रज्वलन करण्यात आले .
प्रास्ताविकात डॉ . सुधीर पोफळे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन श्रीयशा हॉस्पीटलच्या माध्यमातून रुग्णांना चांगली सेवा मिळावी ह्या उद्देशाने हे सेंटर चालु करीत असल्याने सांगितले .
या प्रसंगी पोट विकार तज्ञ डॉ . ऋत्विक आर्वे , वात व मेंदू तज्ञ डॉ .. राजन घाडगे , डॉ . हरिश्चंद्र सावंत – पाटील , डॉ .उत्तम खरात, डॉ . साईप्रसाद खरात, डॉ .साधना खरात उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कामगार प्रतिनिधी विजय पाटील यांनी केले .
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















