पंढरपूर – पंढरपूर तालुका शिक्षक समितीच्या वतीने पंढरपूर पंचायत समितीमध्ये नवनियुक्त गटविकास अमोल जाधव तसेच नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी रोहन कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुनील कोरे, तालुकाध्यक्ष रमेश खारे यांच्या हस्ते नूतन गटविकास अधिकारी अमोल जाधव यांचे स्वागत करुन त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील कोरे यांनी न्यायाची चाड व अन्यायाची चीड हे ब्रीदवाक्य घेऊन शिक्षक समिती पहिल्यापासून शिक्षकांच्या अडीअडचणी व त्यांच्यावर होणारा अन्याया दूर करणेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व गुणवत्ता वाढीसाठी सदैव प्रयत्न करीत असल्याची माहिती दिली. त्यामुळे आपण देखील शिक्षकांचे कुटुंबप्रमुख गटविकास अधिकारी आहात. आपण देखील गटशिक्षणाधिकाऱ्यांशी समन्वय साधून शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मोलाचा वाटा उचलावा अशी देखील अपेक्षा त्यांच्याकडून यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी बोलताना गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांचे योगदान अतिशय मोठं आहे. त्यांच्या ज्या ज्या अडचणी व प्रश्न असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी निश्चित प्रयत्न करेन असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिक्षक समितीचे सर्व पदाधिकारी तसेच समितीच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच सर्व सदस्य देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार तालुकाध्यक्ष रमेश खारे यांनी मानले.
———-
चौकट : पंढरपूर तालुक्याचे नूतन गटशिक्षण अधिकारी रोहन कांबळे यांचा देखील सत्कार शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष पोपट कापसे व तालुका नेते नवनाथ कवडे यांच्या हस्ते करण्यात आला.
Post Views: 12