अक्कलकोट – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित कै. कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालय या संस्थेने शैक्षणिक गुणवत्तेत मोठा टप्पा गाठला आहे. नुकतच संस्थेच्या सर्व पात्र डिप्लोमा अभ्यासक्रमांना नॅशनल बोर्ड ऑफ एक्रेडिटेशन (एन.बी.ए.) चे नामांकन प्राप्त झाले आहे. ही संस्था ए.आय.सी.टी.ई. नवी दिल्ली मान्यता प्राप्त, महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त असून एम.एस.बी.टी.ई.मुंबईशी संलग्न आहे.
(DTE Code: D6474, MSBTE Code: 1205)
एन.बी.ए. सारखे राष्ट्रीय पातळीवरील मानांकन मिळणे म्हणजे संस्थेचा शैक्षणिक दर्जा, प्रयोगशाळा सुविधा, शिक्षकांची गुणवत्ता, विद्यार्थ्यांचे निकाल आणि प्लेसमेंट या सर्व बाबी उच्च दर्जाच्या असल्याची अधिकृत पावती आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थापक कै.कल्याणराव इंगळे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या या संस्थेचे व्यवस्थापन, सर्व प्राचार्य, शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी आणि सर्व हितचिंतकांचे अभिनंदन करण्यात आले आहे. देवस्थानचे व तंत्रनिकेतनचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण मिळावे या हेतूने आम्ही ही संस्था सुरू केली. आज सर्व अभ्यासक्रमांना एन.बी.ए.मानांकन मिळणे हे आमच्या टीमच्या अथक परिश्रमाचे फळ आहे. हा तर केवळ एक टप्पा आहे, Together Towards Excellence या घोषवाक्यानुसार आम्ही अधिक उंची गाठणार आहोत असे सांगून तंत्रनिकेतनचे प्राचार्य व सर्व शिक्षक
शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक करून अभिनंदन केले. या यशामुळे अक्कलकोटच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
Post Views: 14