सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक व विधवा पत्नींना कळविण्यात येते की, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक, त्यांच्या पत्नी व पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, नाट्य व इतर क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजक पुरस्कार प्राप्त, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, आग, दरोडा, अपघात किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे तसेच देश व राज्याची प्रतिष्ठा वाढवेल अशा स्वरूपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक, पत्नी व पाल्य यांना हा पुरस्कार देण्यात येईल.
त्याचबरोबर सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी मध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त आणि १२ वी मध्ये ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणारे, पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले तसेच IIT, IIM, AIIMS अशा नामवंत संस्थांमध्ये प्रवेश मिळालेले माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांनी देखील विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करावेत.
या पुरस्कारासाठी १० हजार रुपये, २५ हजार रुपये, ५० हजार रुपये आणि १ लाख रुपये अशी पुरस्काराची रक्कम आहे.
*आवश्यक कागदपत्रे -*
वैयक्तिक अर्ज (जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध असलेला डी.डी. ४० विहित नमुना फॉर्म), पाल्य शिकत असल्याबाबतचा बोनाफाईड दाखला, मार्कशीटची साक्षांकित प्रत, माजी सैनिक, विधवेच्या ओळखपत्राची छायांकित प्रत, डिस्चार्ज बुकमधील फॅमिली डिटेलच्या पानाची झेरॉक्स प्रत, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, आधार कार्डची छायांकित प्रत, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबाबतचे प्रमाणपत्र, वर्तमानपत्रातील प्रसिद्धी व फोटो याबाबतची कागदपत्रे.
विहित नमुन्याचा फॉर्म जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे उपलब्ध असून अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२६ आहे. त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर (दूरध्वनी क्र. ०२१७-२९९२३३६) येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.
[9/10, 3:21 PM] Sanjay Ghodake Jimaka Sol: *भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी*
सोलापूर, दि. १० (जिमाका) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतींसाठी दि. २१ सप्टेंबर २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत SSB कोर्स क्र. ६६ आयोजित करण्यात येत आहे. या कोर्सच्या कालावधीत प्रशिक्षणार्थींना नि:शुल्क प्रशिक्षण, निवास व भोजनाची सुविधा दिली जाणार आहे.
तरी सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्यदलातील अधिकारी पदाची संधी मिळविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी मुलाखतीस हजर राहावे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे (DSW) यांच्या
http://www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन DSW Portal (Resources – PCTC Nashik – SSB 66) वरील प्रवेशपत्र व त्यासोबत असलेल्या परिशिष्टांची प्रिंट घेऊन, ती पूर्ण भरून सोबत आणावी.
सदर SSB वर्गात प्रवेश मिळण्यासाठी खालीलपैकी कोणतीही एक पात्रता आवश्यक असून त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत आणावे.
*पात्रता -*
*१)* कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CDSE – UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन (NDA – UPSC) उत्तीर्ण असावे व सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.
*२)* एनसीसी स्पेशल एन्ट्रीसाठी SSB मुलाखतीचे कॉल लेटर असावे.
*३)* टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी SSB मुलाखतीचे कॉल लेटर असावे.
*४)* विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी SSB कॉल लेटर असावे किंवा SSB साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई-मेल आयडी
training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ किंवा व्हॉट्सॲप क्र.
९१५६०७३३०६ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.
Post Views: 12