सोलापूर – कवी नरेंद्र गुंडेली लिखित सप्तरंग चारोळी संग्रहाचे प्रकाशन येथील पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या हस्ते, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र भोसले व कवयित्री वंदना कुलकर्णी कार्यवाह मसाप पुणे शाखा सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वा पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयातील विणकर सभागृह येथे प्रकाशन सोहळा होणार आहे. तरी सर्व रसिक व साहित्यप्रेमी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन तेलुगु मराठी साहित्यिक संस्थेचे सचिव दत्तात्रय इंगळे यांनी केले आहे.
——-
Post Views: 15