सोलापूर : प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांकरिता महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षकांमध्ये राष्ट्राला घडविण्याची क्षमता असते, असे प्रतिपादन जेष्ठ स्त्रीरोग तज्ञ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माजी अध्यक्षा डॉ. किरण सारडा यांनी केले. जगदीश पाटील मित्र परिवार प्रतिष्ठानतर्फे बुधवारी गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रमावेळी डॉ. सारडा यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. किरण सारडा, सोलापूर जिल्हा माहेश्वरी महिला संघटनेच्या अध्यक्षा स्मिता हरकुट, सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती जगदीश पाटील उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. अनिता निला, काशिनाथ बडूरे, अमित देशपांडे, रुक्मिणी जोशी आणि ज्योती बांगर या शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
याप्रसंगी अमित पाटील, सुमित पाटील, नवनीत अट्टल, सुप्रिया देशपांडे, अमृता देशपांडे आदी उपस्थित होते. मुरलीधर कडलासकर यांनी प्रास्ताविक केले. शिवाजी रानसर्जे यांनी सूत्रसंचालन तर गोपाल सोमाणी यांनी आभार प्रदर्शन केले.




















