अकलूज (प्रतिनिधी) अकलूज परिसरात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दुष्काळाचे सावट असले तरी वर्षभर शेतीत राबणारे बैल जोडी दुध देणाऱ्या गाई यांचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो त्यामुळे लहान मोठ्या प्रमाणात शेतकरी हा सण साजरा करतो तर घरोघरी पीओपीचे बैलाच्या मूर्तीचे पूजन केले जाते अकलूज मध्ये आज बैल मिरवणुका तुरळकच पाहायला मिळाल्या विजय चौकते शिवापूर पेठ हनुमान मंदिरापर्यंत वाजत गाजत बैलांची व गाईगुरांची मिरवणूक हौशी शेतकऱ्यांनी काढलेली दिसत होती मिरवणुकीमध्ये हलगी लेझीम बेंजो सारखी वाद्य वाजवले जात होती अनेकांनी आपापल्या घरी गाय गुरांची पूजन केले ——– फोटो —— शंकर नगर येथील चंद्रकांत कुंभार यांच्या घरी सणानिमित्त करण्यात आलेले पूजन श्यामा चंद्रकांत कुंभार व कुटुंबीय यांनी विधिवत पूजन केले गाईला गोड नैवेद्य शिंगामध्ये शेंगोळ्या व आंदणाचा दिवा दाखवून पूजन केले