श्रीपूर – अनेक राजकीय नाट्यमय वळणे घेत अखेर भारतीय जनता पार्टीचे तानाजी भगत यांची महाळुंग – श्रीपूर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली . या निवडीने महाळुंग – श्रीपूर नगरपंचायतीवर मोहीते – पाटील यांचे असलले वर्चस्व संपुष्टात आले आहे .
महाळुंग – श्रीपूर नगरपंचायती मध्ये गेल्या पंधरा दिवसा पासून राजकीय सुंदोपसंदी दिसून येत होती याचे महत्वाचे कारण म्हणजे एकूण १७ नगरसेवकां पैकी मोहीते – पाटील यांना मानणारे भिमराव रेडे – पाटील गटाचे ५ व नानासाहेब मुंडफणे गटाचे ४ असे ९ नगरसेवक निवडून आल्याने मोहीते पाटलांचे नगरपंचायती वर वर्चस्व होते . यात नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपा मध्ये आलेले राहूल रेडे – पाटील गटाचे ६ व मुळ भाजपातून आलेला १ व कॉंगेसचा १ असे ८ विरोधी बलाबल होते .
परंतू उपनगराध्यक्षांवर मनमानी कारभार करण्याचा ठपका ठेवून नानासाहेब मुंडफणे यांचे ४ ,राहूल रेडे – पाटील (भाजपा गट ) ६ व भिमराव रेडे – पाटील गटाचे २ नगसेवक यांनी उपनगराध्यक्षा वर अविश्वास ठराव आणून तो पारित केला .
या रिक्त झालेल्या जागेवर शुक्रवार दि . ११ रोजी निवडणुक पार पडली यात तानाजी भगत यांचा एकमेव अर्ज उपनगराध्यक्ष पदासाठी आल्याने त्यांची निवड निवडणुक निर्णय अधिकारी सचित पाटील यांनी जाहीर केली .
यानंतर मुक्त गुलालाची उधळण व तोफांच्या सलामित कार्यकर्त्यानी आनंदोत्सव साजरा केला .
याप्रसंगी नगराध्यक्षा लक्ष्मी अशोक चव्हाण, भाजपाचे गटनेते राहूल रेडे – पाटील, नगरसेवक जोत्स्नाताई सावंत – पाटील , तेजश्री लाटे , नाजीया पठाण , सविता रेडे, शारदा पाटील , निनाद पटवर्धन , सेमनाथ मुंडफणे, नामदेव इंगळे , पै. अशोक चव्हाण , रावसाहेब सावंत – पाटील , विक्रमसिंह लाटे ,मौला पठाण, भाऊसाहेब कुलकर्णी उपस्थित होते .






















