श्रीपूर – वाफेगाव .ता . माळशिरस येथे माढा तालुक्याचे माजी आ. बबनदादा शिन्दे यांचे ७५ व्या वादिवस निमित विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले . मा आ . बबनराव शिंदे, यांचेवर यशस्वी हृदयरोपणाची शस्त्रक्रिया होऊन ते परत आल्यानंतर त्यांचा ७५ वा वाढदिवस प्रत्येक गावोगावी विधायक कार्याने साजरा होत आहे मा . आ . बबनदादा यांनी वाढदिवसा निमित हार फुलांवर खर्च करण्यापेक्षा शालेय साहित्य व सामाजीक उपक्रम राबविणेचे आवाहन केले होते त्यास अनुषंगुन वाफेगांव मध्ये हा उपक्रम राबविणेत आला . मा . आ . बबनदादा शिंदे यांनी अनेक समाज उपयोगी योजना राबवून गेल्या पंधरा वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत . आज माननीय रंजीतसिंह शिंदे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृताताई वाघे, लवंग पंचायत समितीच्या सदस्या ऋतुजा पराडे पाटील यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना, शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले . याप्रसंगी अनिल शिंदे, समाधान गाडे पाटील, मनोज शिंदे, हनुमंत शिंदे, माझी उपसरपंचपुंडलिक शिंदे, शिवतेज शिंदे, प्रताप माने, सुरज गाडे पाटील, पोपटइंगळे , सत्यवान इंगळे, हेंबाडे, समाधान चव्हाण, तसेच लवंग वाघोली , कान्हापुरी बाबळगाव श्रीपुर जांभूड या भागातून कार्यकर्ते उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दादासाहेब गाडे पाटील यांनी केले .
Post Views: 9