सोलापूर – जैन स्थानक वर्धमाननगर येथे पर्युषण पर्व प.पुज्य अक्षयश्रीजी (आखाजी), प. पुज्य मल्लीश्रीजी मसा, प. पुर्य वैभवश्रीजी, प. पुज्य संयमश्रीजी महाराज यांच्या सानीध्यात गेले ७ दिवस सुरु आहे.
उद्या मंगळवारी (दि. १५)पर्युषण महापर्वचा शेवटचा सांवत्सरी दिवस या निमिताने 19 युवक जैन श्रावक श्राविकाने आठ उपवासाची भेट गुरुचरणी अर्पित करणार आहे.
जैन धर्मीयाचे उपवास म्हणजे फक्त पाणी, तेही गरम करून सुर्योदय ते सुर्यात्स पर्यतच. ही प्रेरणा प.पुज्य वैभवश्री व प.पुज्य संयमश्रीजी महाराज यांच्या प्रेरणेने खालील युवक युवतीनी अठाई केली. गौतम सुकलेचा (9 उपवास), राहुल सोनीमंडे, आकाश राका, अक्षय शिंगवी, निरज राका, विजय बलदोटा, हार्दिक गांधी, अरिहंत लोणावत, राज गांधी, धवल व्होरा, मोहीत देसवाल, समकित मकाना, चंदादेवी शिंगवी, शिला सुराणा, हेतल अवलानी, ईशा करनावट, अंकीता भन्साळी, खुशबु पांचाल, खुशी तालेरा इ श्रावक श्राविकाने (आठ) उपवास करून पर्युषण पर्वची सांगता करतील.
Post Views: 9