सोलापूर : नवयान अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी सोलापूर आणि संत कबीर बहुउद्देशीय समाजसेवा मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा हुतात्मा स्मृती मंदिर येथे उत्साहात पार पडली.
पहिल्या सत्रात संत कबीर बहुउद्देशीय समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. डी. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. शाम शिंगे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शिंदे यांनी बचत गटांचा अहवाल सादर केला.उत्कृष्ट काम करणाऱ्या दोन महिला व दोन पुरुष बचत समूहांच्या पदाधिकाऱ्यांचा ज्येष्ठ साहित्यिक बा. ना. धांडोरे व ज्येष्ठ संचालक सर्वोत्तम रणशूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.दुसऱ्या सत्रात अध्यक्ष प्रदीपकुमार कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली नवयान अर्बन सोसायटीची सभा झाली. डॉ. अंगद मुके यांनी प्रास्ताविक केले. कांबळे यांनी २०२४-२५ व २०२५-२६ चा अहवाल मांडला. सचिव डॉ. अरुणकुमार इंगळे यांनी सभासद जीवन विमा, पेन्शन व आरोग्य विमा योजना राबविण्याचा प्रस्ताव मांडला. सभेने तिन्ही योजनांना मंजुरी दिली. यावेळी जिलानी मत्तेखान यांची रेल्वेत क्लास-२ पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. बाबा बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले तर संचालिका अस्मिता माने यांनी आभार मानले.
—-
Post Views: 11