महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेल” यांच्या वतीने माझ्या शैक्षणिक, सामाजिक व विद्यार्थीहिताच्या कार्याची दखल घेऊन अकोला जिल्हा, शेगाव येथे“राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२६” देऊन प्राचार्य इस्माईल शेख सर यांचाच नव्हे तर सोलापूर जिल्ह्याचा सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे, सोलापूर जिल्ह्याचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री सातलिंगप्पा शटगार, सोलापूर जिल्हा काँग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष सुबोध सूतकर, तसेच उष:काल दलित शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव हाजीबंदे नवाज शेख सर, शिक्षक व शिक्षकेतर, कर्मचारी,विद्यार्थी व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पुरस्काराला उत्तर देताना प्राचार्य इस्माईल शेख सर म्हणाले ‘की हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून, माझ्या कार्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि प्रत्येक पावलावर मला प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या आनंद निकेतन महाविद्यालयातील शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी,पालक मित्रपरिवार, सहकारी आणि हितचिंतकांचा सामूहिक सन्मान आहे,ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्यरत राहण्याची नवी ऊर्जा, नवी प्रेरणा आणि अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा हा पुरस्कार सोहळा जीवनातील अमूल्य क्षण होता.
या सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष माननीय आमदार साजिद खान पठाण तसेच माननीय आमदार धिरज लिंगाडे यांच्या शुभहस्ते पुरस्कार स्वीकारताना मन आनंदाने आणि कृतज्ञतेने भरून आले. तसेच प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष प्रकाश सोनवणे, अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश तायडे, अकोला महानगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र गवई इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल शुभेच्छा देणारे सर्व हितचिंतक पत्रकार यांचे मनःपूर्वक आभार मानले.
Post Views: 7