धाराशिव – आरोग्यम् धनसंपदा याप्रमाणे धाराशिव शहरातील रणसम्राट गणेश मंडळाने १५० नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करीत आरोग्याचा श्री गणेशा केला आहे. तसेच हे गणेश मंडळ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, रक्तदान, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप यासारखे विविध समाज उपयोगी उपक्रम गेल्या २४ वर्षांपासून राबवित असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अभिराज कदम यांनी दिली.
धाराशिव शहरातील तांबरी विभागातील रणसम्राट चौकात असलेल्या रणसम्राट गणेश मंडळ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा उपक्रम राबविण्यात आला. या आरोग्य शिबिरामध्ये मधुमेह, रक्तदाब, डोळे, कान, नाक, घसा, रक्त, लघवी, सांधेदुखी, गुडघेदुखी आदींसह विविध प्रकारच्या आरोग्याच्या तपासण्या करण्यात आल्या. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अभिराज कदम, आकाश चौगुले, कृष्णा पुसदेकर, आकाश मेटे, सुजल क्षिरसागर, महादेव पाचभाई, विशाल घोलप, सिद्धांत नरवडे, अनिकेत आगलावे, दत्ता शिरसकर यांच्यासह डॉ. सागर जानराव (डोळा), डॉ राजशेखर मुंगळे (मेडिसिन), डॉ सुयश इंगळे (अस्थिरोग तज्ञ), डॉ. सौम्या (सर्जरी), डॉ लगदीर गायकवाड, डॉ सिद्धेश पाचपुते, डॉ सौरभ पांढरे, डॉ संकेत वरगडे, डॉ निखिल हटवटे, डॉ सायली जाधव, ऐश्वर्या शिरसे यांच्यासह आरोग्य कर्मचारी व गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
……..
दरवर्षी श्रींची मूर्ती एक इच्छापूर्ती बाप्पा यातून चिट्टीद्वारे मूर्ती देण्यास नंबर असतो. आजपर्यंत
लोकांमार्फत गणपतीसाठी १ किलोच्या आसपास चांदी व १५ किलोची पितळी दीपस्तंभ नवासपूर्ती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मंडळाच्या उभारणीमध्ये स्त्रियांचा मोठा सहभाग आहे. तर
विसर्जन मिरवणुकीत मुले आणि मुली हे पारंपारिक लेझीम व झांज पथकात सहभागी होऊन मिरवणूक करतात. तर २०१६ व २०१७ मध्ये पत्रकार संघाचे उत्तेजनार्थ तर २०१८ चे द्वितीय पारितोषिक मंडळाने फटकाविले आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या महाभयंकर संकट काळात रक्तदान शिबिरासह किराणा मालाच्या किटचे वाटप करण्यात आले. तर सलग पाचव्या वर्षी खेळ पैठणीचा व लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा आणि नृत्य स्पर्धा घेऊन स्त्रिया व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याची माहिती कदम यांनी दिली.
Post Views: 16