बार्शी – तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नं. २९२/२०२६ प्रकरणातील BNS 109(1), 115(2),352,351(2) आदी कलमातर्गत आरोपी विशाल संजय वाणी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला. आरोपीतर्फे ॲड. विशाल गोणेकर यांनी युक्तिवाद करताना आरोपी हा कथित घटनेच्या वेळी घटनास्थळी उपस्थित नव्हता, तसेच त्यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज न्यायालयासमोर दाखल करण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले.
आरोपीतर्फे करण्यात आलेला युक्तिवाद व सादर करण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज विचारात घेत जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. सुरज केंद्रे यांनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला. न्यायालयाच्या आदेशानुसार रुपये २५ हजारांच्या मुचलक्यावर आरोपीची जामिनावर सुटका करण्यात आली.
या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. विशाल गोणेकर, ॲड. अमोल अलाट आणि ॲड. पांडुरंग घोलप यांनी काम पाहिले.
Post Views: 10