Thursday, October 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विधान परीषद पदवीधर निवडणुकीत असे करा मतदान

तरुण भारतbyतरुण भारत
October 1, 2026
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर – भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीची मतदान पद्धती आणि आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या अन्य सार्वत्रिक निवडणुकातील मतदानाची पद्धती यात मूलभूत फरक आहे. विधानपरिषद निवडणूकीचे मतदान हे मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावापुढे पसंतीक्रम नोंदवून घेण्यात येते. जितके उमेदवार निवडणूक लढवित असतील अशा सर्वांपुढे पसंतीक्रम नोंदविता येतो. मतदानाच्या या वेगळ्या पद्धतीमुळे मतदारांनी आणि विशेषत: प्रथमच मतदान करणाऱ्यांनी ही पद्धत जाणून योग्यरितीने मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.
मतदान करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याने मतपत्रिकेबरोबर पुरवलेले जांभळ्या रंगाचे स्केच पेनच वापरावे. अन्य कोणतेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईन्ट पेन किंवा अन्य कोणतेही लेखनाचे साधन मतदानासाठी वापरु नये. असे केल्यास तुमची मतपत्रिका अवैध ठरेल.
उमेदवाराच्या नावाच्या स्तंभासमोर पसंतीक्रम म्हणून असलेल्या स्तंभामध्ये तुम्ही प्रथम पसंतीचा उमेदवार म्हणून निवडलेल्या उमेदवाराच्या नावासमोर १ असा आकडा लिहून मतदान करा. हा १ हा आकडा फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर द्यावा. एकापेक्षा अधिक उमेदवारांची निवड करावयाची असली तरीदेखील १ हा आकडा फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर घाला.
निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता जेवढे उमेदवार निवडणूक लढवत असतील तेवढे पसंतीक्रम तुम्हाला देता येतील. उदाहरणार्थ, पाच उमेदवार निवडून द्यावयाचे असतील तरीही तुम्हाला तुमच्या निवडीच्या पसंतीक्रमाने उमेदवारांच्या नावासमोर १ ते ५ असे आकडे घालता येतील.  उर्वरीत उमेदवारांबाबतचा तुमचा पुढील पसंतीक्रम, अशा उमेदवारांच्या नावासमोर असलेल्या पसंतीक्रम या स्तंभामध्ये तुमच्या पसंतीक्रमानुसार २, ३, ४ इत्यादी आकडे घालून दर्शवा.
कोणत्याही उमेदवाराच्या नावासमोर आपण फक्त एकच आकडा घातलेला आहे याची खात्री करून घ्यावी. तसेच तोच आकडा एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर घातलेला नाही याची देखील खात्री करुन घ्यावी. पसंतीक्रम फक्त १, २, ३ इत्यादी आकड्यांमध्येच दर्शवावा. एक, दोन, तीन इत्यादी शब्दांमध्ये दर्शवू नये. पसंतीक्रमाचे आकडे भारतीय अंकाच्या 1, 2, 3 इत्यादींसारख्या आंतरराष्ट्रीय रुपात किंवा I, II, III इत्यादींसारख्या रोमन रुपात किंवा १, २, ३ अशा देवनागरी रुपात किंवा संविधानाच्या अनुसूची आठमधील मान्यता दिलेल्या कोणत्याही एका भारतीय भाषेमध्ये वापरण्यात येणाऱ्या रुपामध्ये चिन्हांकित करता येतील.
मतपत्रिकेवर मतदाराने आपले नाव, आद्याक्षरे किंवा अन्य शब्द लिहू नयेत किंवा स्वाक्षरी करु नये. तसेच आपल्या अंगठ्याचा ठसा देखील उमटवू नये. असे केल्यास आपली मतत्रिका अवैध ठरेल.
पसंतीक्रम दर्शविण्यासाठी तुमच्या निवडीच्या उमेदवाराच्या नावासमोर √ किंवा X अशी खूण करणे पुरेसे होणार नाही. अशा मतपत्रिका बाद करण्यात येतील. पसंतीक्रम फक्त आकड्यांमध्येच दर्शवावा.
आपली मतपत्रिका वैध ठरण्यासाठी एकूण उमेदवारांपैकी एका उमेदवारासमोर १ हा आकडा लिहून तुमची पहिली पसंती दर्शवणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम देणे ऐच्छिक आहेत. म्हणजेच इच्छेनुसार दुसरी किंवा पुढील पसंती दर्शवावी अथवा दर्शवू नये.
*अशा मतपत्रिका अवैध ठरतील:*
१ हा आकडा घातलेला नसल्यास. १ हा आकडा एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर घातलेला असल्यास. १ हा आकडा, तो कोणत्या उमेदवाराला देण्यासाठी घातलेला आहे याबाबत शंका निर्माण होईल अशाप्रकारे घातलेला असेल. एकाच उमेदवाराच्या नावासमोर १ आणि त्याबरोबर २, ३ इत्यादी आकडे देखील घातलेले असतील. पसंतीक्रम आकड्याऐवजी शब्दांमध्ये दर्शवलेला असेल. मतदाराची ओळख पटू शकेल अशी कोणतीही खूण किंवा लेखन असले, आणि असे आकडे घालण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेन व्यतिरिक्त अन्य साधनाने कोणताही आकडा घातलेला असेल, तरी अशी मतपत्रिका अवैध ठरेल.
0000
Post Views: 18
Previous Post

राग, स्वर, ताल अन् सादरीकरणातून ‘अण्णाभाऊ साठे संगीत मंचा’वर शास्त्रीय सुरांची मैफल

Next Post

श्रीकृष्ण शैक्षणिक समूह अंतर्गत सुरू असणाऱ्या एम. बी. चव्हाण गुरुकुलचा क्रिकेटमध्ये दणदणीत विजय

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
श्रीकृष्ण शैक्षणिक समूह अंतर्गत सुरू असणाऱ्या एम. बी. चव्हाण गुरुकुलचा क्रिकेटमध्ये दणदणीत विजय

श्रीकृष्ण शैक्षणिक समूह अंतर्गत सुरू असणाऱ्या एम. बी. चव्हाण गुरुकुलचा क्रिकेटमध्ये दणदणीत विजय

ताज्या बातम्या

एसबीआय  म्युच्युअल फंडाला ग्राहक मंचाचा दणका

October 1, 2026
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, उंडेगाव येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती उत्साहात

रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, उंडेगाव येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती उत्साहात

October 1, 2026
लोकसेवा विद्यालयाच्या असफ मुजावरची जिल्हास्तरीय कुस्तीत चमकदार कामगिरी

लोकसेवा विद्यालयाच्या असफ मुजावरची जिल्हास्तरीय कुस्तीत चमकदार कामगिरी

October 1, 2026

चालत्या बसमध्ये महिलेचा विनयभंग

October 1, 2026

‘AI आणि माध्यमांची भूमिका’ विषयावर सोलापूर विद्यापीठात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

October 1, 2026

पिलीव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

October 1, 2026
मिनल साठे यांची सुकाणू समितीच्या अशासकीय सदस्य पदी निवड

मिनल साठे यांची सुकाणू समितीच्या अशासकीय सदस्य पदी निवड

October 1, 2026
चोरीचा ट्रॅक्टर जप्त, दोघांना अटक!

चोरीचा ट्रॅक्टर जप्त, दोघांना अटक!

October 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1287918

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!