कामती खुर्द : श्रीकृष्ण शैक्षणिक समूह अंतर्गत सुरू असलेल्या एम. बी. चव्हाण गुरुकुल, कामती खुर्द येथील १७ वर्षे वयोगटातील क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात माध्यमिक विद्यालय, शेटफळ संघाचा पराभव करत विजेतेपद मिळविले. या दमदार कामगिरीमुळे संघाची जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.*
*या विजयामुळे तालुकास्तरीय क्रिकेटमध्ये एम. बी. चव्हाण गुरुकुलच्या संघाचा दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल श्रीकृष्ण शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष प्रा. प्रमोद आवताडे सर, उपाध्यक्ष हनुमंत निकम (मामासाहेब), प्राचार्य प्रा. प्रतिक जगदाळे सर, खजिनदार आप्पासाहेब कोळी सर, क्रीडाशिक्षक आकाश भद्रशेट्टी सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी संघाचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.*






















