अक्कलकोट – येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे भाविकांचे मुख्य श्रध्दास्थान आहे. धर्मादाय आयुक्तालयामार्फत आम्ही राज्यभरातील अनेक देवस्थानांचे कामकाज पाहतो, पण अक्कलकोटच्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचा कारभार हा एक वेगळा आदर्श आहे. या मुळे असे वाटते की श्री वटवृक्ष देवस्थान समितीचा कार्यभार आदर्शवत असल्याचे मनोगत पुणे विभागाचे धर्मादाय सहआयुक्त दिनेश कोटलीकर यांनी व्यक्त केले.
नुकतेच धर्मादाय सहआयुक्त दिनेश कोटलीकर यांच्यासह धर्मादाय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज श्री क्षेत्र अक्कलकोट येथे भेट देऊन श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक व मंदीर समितीचे चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व स्वामींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी
सोलापूर विभागाचे धर्मादाय उपायुक्त ईश्वर सूर्यवंशी, तदर्थ जिल्हा न्यायाधीश ओमशंकर पाटील, सोलापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे अधीक्षक महादेव जावळे, निरीक्षक उमेश देशमुख यांचाही चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते स्वामींचे कृपावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी धर्मादाय सहआयुक्त दिनेश कोटलीकर बोलत होते.
पुढे बोलताना धर्मादाय सहआयुक्त दिनेश कोटलीकर म्हणाले की इथे भाविकांसाठी असलेली दर्शन व्यवस्था, निवास, स्वच्छता आणि पारदर्शक हिशोब या सर्व बाबी अत्यंत उत्कृष्ट आहेत. महेश मालक इंगळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे व्यवस्थापन पाहून खूप समाधान वाटले. शासनाच्या नियमांचे पालन करत मंदिराचा विकास होत आहे हे कौतुकास्पद असल्याचे मनोगतही व्यक्त करून मंदीर समितीच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रथमेश इंगळे, पुरोहित मंदार महाराज पुजारी,
ॲड.विजय हर्डीकर,
सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, विपूल जाधव, सागर गोंडाळ, ऋषिकेश लोणारी आदीसह भाविक भक्त उपस्थित होते.
फोटो ओळ – धर्मादाय सहआयुक्त दिनेश कोटलीकर, धर्मादाय उपायुक्त ईश्वर सूर्यवंशी, तदर्थ जिल्हा न्यायाधीश ओमशंकर पाटील यांचा सत्कार करताना चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे, मंदार महाराज व अन्य दिसत आहेत.