पंढरपूर – महात्मा गांधी जयंती आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आयकर विभाग सोलापूर यांच्या वतीने खर्डी (ता.पंढरपूर) येथे ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत श्री सिताराम महाराज मंदिराची स्वच्छता करून ग्रामस्थांना स्वयंम स्वच्छता व ग्राम स्वच्छता बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
आयकर विभाग पुणेचे मुख्य कमिशनर संजिव जैन व सोलापूर विभागाचे आयुक्त वैभव ढेरे यांच्या हस्ते स्वच्छता अभियानाचे उदघाटन स्वच्छता करुन करण्यात आले. यावेळी युवानेते प्रणव परिचारक, पंढरपूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर, पंढरपूर पंचायत समितीचे सभापती डॉ.शुभंम आगावणे,डॉ.अरूण मेनकुदळे, पंढरपूरचे आयकर अधिकारी दिनेश सिंह, श्रीनिवास मंगलपल्ली, सोलापूरचे आयकर उपआयुक्त सुभाष पाटील,सुरज पावले, खर्डी ग्राम पंचायतीचे सदस्य नारायण रोंगे, मंदिराचे ट्रस्टी व मुख्य पुजारी बापू केसकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————-
चौकट : (मंदिराला डस्टबीन भेट)
यावेळी सिताराम महाराज मंदिराला आयकर विभाग सोलापूर यांच्या वतीने चार मोठ्या डस्टबीन भेट म्हणून देण्यात आल्या.
Post Views: 9