सोलापूर – येथे झालेल्या 17 वर्षांखालील शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत डी.बी.एफ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या कुणाल गणेश कुंटला याने 71 किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला.
या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पुणे येथे होणाऱ्या पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. कुणाल यास शारीरिक शिक्षण शिक्षक डॉ. शैलेश बंडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. महेशजी चोप्रा, प्रशासक डॉ. व्ही. बी. उबाळे, प्राचार्य श्री. बी. एच. दामजी, उपप्राचार्य एस. एम. जगताप, पर्यवेक्षक शहाजी मादळे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Post Views: 58