सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राध्यापकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या अग्रगण्य ‘सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघ’ (सुटा)च्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूर येथे आयोजित जनरल कौन्सिलच्या बैठकीत डॉ. नेताजी कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रा. डॉ. शशिकांत गायकवाड यांनी कामकाज पाहिले. या जनरल कौन्सिल सभेमध्ये अध्यक्षपदी प्रा. डॉ. वशिष्ठ गुरमे, जनरल सेक्रेटरीपदी प्रा. डॉ. राजेंद्र सूर्यवंशी , खजिनदारपदी प्रा. डॉ. जैनोद्दीन मुल्ला, कार्यालयीन कार्यवाहपदी प्रा. डॉ. विकास शिंदे आणि अंतर्गत लेखापालपदी प्रा. डॉ. रामचंद्र पवार यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर नवनिर्वाचित नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा. डॉ. वशिष्ठ गुरमे यांनी शिक्षक व शिक्षण हित जोपासण्यासाठी सुटा सर्व समावेशकपणे कटिबद्ध असल्याचे सांगितले व जनरल सेक्रेटरी प्रा. डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी, प्राध्यापकांच्या सेवाशर्ती, प्रलंबित मागण्या, विद्यापीठ स्तरावरील विविध प्रश्न आणि उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी ही नवीन कार्यकारिणी सदैव तत्परतेने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. खजिनदार प्रा. डॉ. जैनोद्दीन मुल्ला यांनी संघटनेची आर्थिक व संघटनात्मक घडी अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन पुढील वाटचाल करणार असल्याचे नमूद केले. नूतन अंतर्गत लेखापाल डॉ रामचंद्र पवार यांनी पारदर्शकपणे व काटकसरीने संघटनेची आर्थिक शिस्त जपणार असल्याचे स्पष्ट केले. विद्यमान पदाधिकारी अध्यक्ष डॉ नेताजी कोकाटे, जनरल सेक्रेटरी डॉ. भगवान आदटराव, अंतर्गत लेखापाल प्रा. संजय देवकर यांनी या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांच्याकडे कार्यभार सुपूर्द केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. जुन्या कार्यकारिणीने मागील दोन वर्षाच्या कालावधीमध्ये संघटनेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल जनरल कौन्सिलच्यावतीने अभिनंदन व आभार मानणारा ठराव मंजूर करण्यात आला. नूतन कार्यालयीन कार्यवाह डॉ. विकास शिंदे यांनी सुटाच्या सर्व जनरल कौन्सिल सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















