सोलापूर – राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत गुळवंची येथे मेरा युवा भारत, ग्रामपंचायत गुळवंची आणि सद्गुरू आण्णा माऊली माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष स्वच्छता शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत परिसराची स्वच्छता केली.
स्वच्छता अभियानादरम्यान विद्यार्थी व शिक्षकांनी जिल्हा परिषद शाळा तसेच परिसरातील कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचा संदेश ग्रामस्थांना दिला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली.
या स्वच्छता शिबिरास जिल्हा युवा अधिकारी आकाश जीनगर, सरपंच सुनील जाधव, सुभाष चव्हाण, अनिल ढेंगे, धनराज पाटील, सद्गुरू आण्णा माऊली माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोजकुमार पुजारी, गौतम आतकरे, दत्तात्रय काळे, सुहास भोसले, आसिफ तांबोळी, विशाल माने, सौदागर बोराडे, धर्मा डोलारे, प्रभाकर राऊत, अमोल खरात तसेच ग्रामपंचायत कर्मचारी अमोल बोराडे, परसराम कदम यांच्यासह स्थानिक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थी आणि शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी कौतुक केले.
Post Views: 14