जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शहरस्तरीय आंतरशालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलांच्या वयोगटात मॉडेल पब्लिक स्कूलच्या बद्री रेब्बा याने ६५ किलो वजनीगटात द्वितीय क्रमांक व विराट पाटील याने ६० किलो वजनीगटात तृतीय क्रमांक पटकविला.
या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. ए. डी. जोशी, सचिव अमोल जोशी, श्री साई महिला प्रतिष्ठानच्या सचिवा सायली जोशी, मुख्याध्यापिका अदिती कुलकर्णी व ममता बसवंती यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
या खेळाडूंना क्रीडाशिक्षक रविकिरण आवटे यांचे मार्गदर्शन लाभले.























