बार्शी – जिजाऊ गुरुकुल सैनिक पॅटर्न शाळा, खांडवी येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत क्रीडाक्षेत्रात आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. विविध क्रीडा प्रकारांत उत्कृष्ट प्रदर्शन करत तब्बल ३५ खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली, ही संस्थेसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.
१४, १७ आणि १९ वर्षांखालील तिन्ही गटांत गुरुकुलच्या खेळाडूंनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावून आपल्या शाळेच नावलौकिक वाढवला आहे.
स्पर्धेचा निकाल व निवड झालेले खेळाडू- १७ वर्षांखालील गट- १०० मी. धावणे- गौरव धालगडे (प्रथम), सार्थक ताकभाते (प्रथम). २०० मी. धावणे- विवेक बैकरे (प्रथम), सूरज जाधव (द्वितीय). ४०० मी. धावणे- गौरव धालगडे (प्रथम), सार्थक ताकभाते (द्वितीय). ८०० मी. धावणे- आर्यन भोसले (तृतीय). ३००० मी. धावणे- राज पवार (प्रथम), शुभम बाबर (तृतीय). ५००० मी. चालणे- सत्यम काळोखे (प्रथम), धनराज गाढवे (द्वितीय). क्रॉसकंट्री (६ कि.मी.)- आर्यन भोसले (प्रथम), राज पवार (द्वितीय).
११० मी. हर्डल्स (अडथळा शर्यत)- धनराज गाढवे (प्रथम). ४०० मी. हर्डल्स (अडथळा शर्यत)- सार्थक कोळी (प्रथम), गिरीश झोडगे (द्वितीय). तिहेरी उडी- धनराज गाढवे (तृतीय). ४x१०० मी. रिले- गौरव धालगडे, सार्थक ताकभाते, विवेक बेकरे, आर्यन ताकभाते आणि हर्ष खानेकर (राखीव). ४x४०० मी. रिले- राज पवार, यश आवारे, धनराज गाढवे, सार्थक कोळी आणि गौरव धालगडे.
१९ वर्षांखालील गट- १५० मी. धावणे: समर्थ सुरवसे (द्वितीय). ३००० मी. धावणे: समर्थ कोकाटे (द्वितीय).
५००० मी. चालणे- सरगम तरंगे (प्रथम), प्रणव माने (द्वितीय). क्रॉसकंट्री (६ कि.मी.)- स्वप्निल माने (प्रथम), मयूर बुद्रुक (प्रथम). ११० मी. हर्डल्स- स्वप्निल माने (प्रथम). ४०० मी. हर्डल्स- सार्थक बंड (प्रथम), शिवराज शिंदे (द्वितीय).
लांब उडी- ्सार्थक बंड (प्रथम). तिहेरी उडी- मयूर बुद्रुक (प्रथम). बांबू उडी- समर्थ कोकाटे, ओम मोरे. ४x४०० मी. रिले- सार्थक बंड, शिवराज शिंदे, मयूर बुद्रुक, स्वप्निल माने आणि समर्थ कोकाटे (राखीव)
१४ वर्षांखालील गट- १०० मी. धावणे- रणवीर घाडगे (प्रथम). २०० मी. धावणे- राजवर्धन पारेकर (द्वितीय).
४०० मी. धावणे- आदित्य कोंढारे (प्रथम). ६०० मी. धावणे- राजवर्धन पारेकर (प्रथम), दत्तराज शिंदे (द्वितीय)
४x१०० मी. रिले- कृष्णा शेळके, यश साळुंखे, रणवीर घाडगे, दत्तराव शिंदे आणि राजवर्धन पारेकर (राखीव).
विद्यार्थ्यांच्या या यशामागे जिजाऊ गुरुकुलचे अध्यक्ष संभाजी घाडगे आणि सचिवा वर्षाताई घाडगे यांचे प्रोत्साहन, क्रीडाप्रेम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली सकारात्मक भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. त्यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे विशेष कौतुक करुन आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशस्वी वाटचालीत संस्थेचे प्रशासकीय अधिकारी किशोर कदम, फिजिकल कोच जे. बी. शिंदे, क्रीडा विभाग प्रमुख गणेश वडेकर, तसेच क्रीडाशिक्षक निहार आणि प्रतीक यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षकांच्या नियोजनबद्ध सरावामुळे, शिक्षकांच्या सहकार्यामुळे आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे हे यश संपादन करणे शक्य झाले.
या शानदार यशाबद्दल संस्थेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेतही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करुन संस्थेचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहेत.
Post Views: 10