परंडा – परंडा-वाशी-भूम मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मातोश्री भिवराबाई जयवंत सावंत यांचे मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी वयाच्या १०५ व्या वर्षी पुणे येथे निधन झाले. त्यांनी पुणे येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
भिवराबाई सावंत या आमदार डॉ. तानाजी सावंत तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. शिवाजीराव सावंत यांच्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाची बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अंत्यविधी वाकाव येथे
भिवराबाई सावंत यांच्या पार्थिवावर वाकाव येथील जयवंत बंगला येथे दि.१४ रोजीसकाळी १०:३० वाजण्याच्या दरम्यान अंत्यविधी करण्यात आला.
यावेळी नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनची उपस्थित होते.
Post Views: 14