सांगोला – नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये पदभार घेतलेले पाणीपुरवठा अभियंता यांनी मनमानी कारभार चालू केल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून शासनाने समिती नेमून त्यांची चौकशी करावी अशी मागणी सांगोला नगरपालिकेचे माजी नगरसेवक सतीश सावंत यांनी नगर विकास मंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. पाणीपुरवठा अभियंता यांच्या मनमानी कारभारामुळे सांगोला शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना पाणी वेळेवर मिळत नाही. तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. सणासुदीच्या दिवसांमध्ये नागरिक त्रस्त झालेले आहेत. तरी सदर पाणीपुरवठा अभियंता यांची शासनाने समिती नेमून त्यांची चौकशी करावी अशी मागणी सतीश सावंत यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
Post Views: 20