सांगोला – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय, अहिल्यानगर यांच्या वतीने प्रवरानगर (जि. अहिल्यानगर) येथे आयोजित विभागस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या इ.१२ वी मधील साक्षी संतोष केदार हिने प्रथम क्रमांक पटकावला असून तिची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच बरकतली इरफान मुलाणी (इ.११ वी), सोहम सचिन चव्हाण (इ.१० वी) आणि माधवी अंकुश नरळे (इ.१२ वी) यांनीही चमकदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. यशस्वी खेळाडूंचा सत्कार संस्थेचे खजिनदार शंकरराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राचार्य चारुदत्त जगताप, उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक शुभांगी घोंगडे, मकरंद अंकलगी उपस्थित होते. यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रा.सचिन चव्हाण, सुनील भोरे, प्रा.डी.के.पाटील, नरेंद्र होनराव, सुभाष निंबाळकर, प्रा.संतोष लवटे आणि स्नेहल देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्था अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, संस्था उपाध्यक्ष ॲड.विजयसिंह चव्हाण, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, सदस्य शीलाकाकी झपके, विश्वेश झपके, पर्यवेक्षक काकासो नरूटे यांनी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
चौकट-
साक्षी केदार हिने विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून तिने सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे. विशेष म्हणजे, बॉक्सिंगसारख्या आक्रमक खेळासोबतच ‘वुशू’ या क्रीडा प्रकारातही तिने राज्यस्तरावर मजल मारली आहे. तिची ही सातत्यपूर्ण आणि बहुआयामी क्रीडा कामगिरी शाळेसाठी तसेच सांगोला तालुक्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.