अकलूज – लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंत नगर येथील विद्यार्थिनींनी तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत प्रशालेच्या क्रीडा यशात मानाचा तुरा रोवला.अकलूज येथील शंकराव मोहिते महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रशालेच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात उत्कृष्ट प्रदर्शन केले.
17वर्षे वयोगटात 4× 100 मीटर रिले स्पर्धेत श्रावणी काळे,श्रावणी पाटोळे,श्रावणी साठे,संस्कृती काळे व नंदिनी इंदलकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला.तसेच वॉकिंग मध्ये भावना रणदिवे हिने प्रथम व वृंदा बागल हिने द्वितीय क्रमांक पटकावत प्रशालेचा गौरव वाढवला. थाळीफेक मध्ये सोनाली शेंडगे ने प्रथम व ऋतुजा काळे हिने द्वितीय क्रमांक मिळवून क्रीडा क्षेत्रातील आपली गुणवत्ता सिद्ध केली.पार्वती खुडे हिने 3000 मीटर धावणे तृतीय क्रमांक पटकावला.
19 वर्ष वयोगटामध्ये 4×100 मीटर रिले स्पर्धेत वैष्णवी पवार,कल्याणी भालके,महेक बागवान,साक्षी पाटील व प्रतीक्षा लांडगे यांनी
द्वितीय क्रमांक पटकावला. थाळीफेक मध्ये मयुरी काळे हिने तृतीय क्रमांक पटकावला. क्रॉस कंट्री मध्ये श्रावणी काळे हिने पाचवा क्रमांक व पार्वती खुडे हिने सहावा क्रमांक पटकावला.
विद्यार्थिनींनी केलेल्या या यशस्वी कामगिरी मागे त्यांची मेहनत,नियमित सराव,जिद्द आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थिनींनी आपली वेगळी ओळख निर्माण करावी यासाठी प्रशालेत सातत्याने प्रोत्साहन दिले जाते.या सर्व खेळाडूंचा सन्मान समारंभ व्यासपीठावर प्रशालेच्या वतीने पार पडला.तसेच मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान व्यासपीठावर संपन्न झाला.
या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील,अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील,संचालिका तथा प्रशालेच्या सभापती कु . स्वरूपाराणी मोहिते पाटील ,सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ अनिता पवार मॅडम शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडूंची अभिनंदन केले.आणि पुढील क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
जिद्द मेहनत आणि सातत्यपूर्ण सराव यांच्या जोरावर मैदानावर मिळवलेले यश हेच उज्वल भविष्याचे पहिले पाऊल आहे या यशस्वी कामगिरीमुळे लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.
Post Views: 30