सोलापूर -कर्जास कंटाळून एका 54 वर्षीय शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
नागनाथ अमोगसिद्ध राऊत (वय 54 वर्ष, रा.इंगळगी ता.दक्षिण सोलापूर) असे मयताचे नाव आहे. शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या मृतदेह शेतातील चिंचेच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांना फासातून सोडवून गणपती (भाऊ) यांनी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मयत नागनाथ राऊत यांच्या पश्चातत दोन मुले असा परिवार आहे. काही दिवसापूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते.शेती व्यवसायातील कर्जामुळे ते आर्थिक विवंचनेत होत्याची माहिती नातेवाईकानी दिली.
Post Views: 13