सोलापूर -दारूच्या नशेत एका 55 वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शेळगी परिसरातील शिवगंगा नगरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली.
सतीश शिवाजी क्षीरसागर (वय 55 रा.शिवगंगानगर शेळगी) असे मयताचे नाव आहे. रात्री आठ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह घरातील छताच्या लाकडीवाशाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.त्याला दारूचे व्यसन होते.घरात कोणी नसताना त्याने हा प्रकार केला. ही घटना समजतात जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे हवालदार वाडीकर यांनी घटनास्थळी पोचून सदरचा मृतदेह येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी त्याला मृत घषित केले .