मंगळवेढा – मंगळवेढा येथील सप्तशृंगी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत पंढरपूर येथील वासुदेव बाबाजी नवरंगे बालकाश्रमातील अनाथ बालकांना धान्यदान वाटप करून समाजातील वंचित आणि गरजू घटकांना मदतीचा हात पुढे केला आहे
नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक उपक्रम राबवून गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचा मंडळाचा नेहमीच प्रयत्न राहिला असुन यांच्याप्रती संवेदनशीलता जपणे आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना वृद्धिंगत करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
अन्नदान हेच श्रेष्ठ दान या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सामाजिक सेवेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला असुन धार्मिक उत्सव केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न ठेवता त्याला समाजसेवेची जोड देण्याचे काम सप्तशृंगी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.
अशा उपक्रमांतून सामाजिक एकोपा, सेवाभाव आणि माणुसकीची भावना अधिक दृढ होत असून मंडळाच्या या सामाजिक कार्याचे नवरंगे बालकाश्रमाने कौतुक करीत आभार मानले यावेळी बालकाश्रमाच्या राजश्री गाडे यांचेसह मंडळाचे अध्यक्ष समाधान डोंगरे माजी अध्यक्ष दत्तात्रय जावळे,शरद हेंबाडे दिलीप वाडेकर,संतोष डोंगरे,विनोद नागणे,ऋतुराज भगत,रणजित चेळेकर,डॉ युवराज पवार,सौरभ गुंड,रामेश्वर पवार,शिवाजी जगदाळे,ओम खटकळे,गोटू माने,सुधीर सांवंजी,कृष्णा ओमणे,शरद रूपनर आदीजण उपस्थित होते
Post Views: 6