सोलापूर – मराठा समाज सेवा मंडळाच्यावतीने दसरा महोत्सव व वैचारिक सीमोल्लंघन २०२६ अंतर्गत मराठा समाजातील नूतन नगरसेवकांचा सत्कार सोहळा सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता मुरारजी पेठेतील सरस्वती चौक परिसरातील छत्रपती शिवाजी प्रशालेच्या राजर्षी शाहू सभागृहातआयोजित करण्यात आला आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार असून, मंडळाचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे हे अध्यक्षस्थानी असतील. याप्रसंगी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, आई शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या उपकुलगुरू डॉ. स्मिता जाधव आणि मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाष माने यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या वेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्यासह अमोल शिंदे, जयकुमार माने, वृषाली चालुक्य, वैशाली भोपळे, श्रध्दा पवार,विनोद भोसले, अनंत जाधव, गणेश वानकर, मनीष केत, मनोरमा सपाटे, प्रियदर्शन साठे , कल्पना कदम, पूनम काशीद, आणि मृण्मयी गवळी या नूतन १५ नगरसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
मराठा समाज सेवा मंडळ ही संस्था १९६० पासून शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘शिवतीर्थ समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्याची परंपराही संस्थेने जपली आहे. यंदाच्या दसरा महोत्सवाच्या निमित्ताने नूतन नगरसेवकांचा गौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे सरचिटणीस प्रा.महेश माने यांनी केले आहे.
Post Views: 7