पिलीव – महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागात पशुधनादवारे उद्योजक निर्माण व्हावेत म्हणून मुख्यमंञी ग्रामीण पशुधन योजना सात महिन्यापुर्वी सुरु केली असली तरीही प्रत्यक्षात ही योजना अजूनपर्यंत ॲपमधयेच अडकली असुन समाजमाधयमावर या योजनेच्या बनावट जाहिरातींनी अक्षरश धुमाकूळ घातला आहे. यापासून सावध राहणे गरजेचे आहे. अन्यथा आर्थिक फसवणुकीची शक्यता निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात 9 मार्च रोजी शासनाने या महतवकांक्षी योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात पशुपालनादवारे उद्योजक निर्माण करणे असुन याद्वारे लाभार्थ्यांना दुधाळ गायी, म्हशी, शेळया, मेंढ्या, कुक्कुटपालन, वराह अनुदान तत्वावर देणे. या योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पणे व्हावी म्हणून ही योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसीत करणयाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे लवकरच यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित होणार असुन याद्वारे लाभार्थी ऑनलाईन अर्ज भरु शकतात. परंतु ही योजना सुरु होण्यापूर्वीच समाजमाधयमावर ऑनलाईन जाहिरातींनी अक्षरश धुमाकूळ घातला असुन याद्वारे फसवणुकीच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. यामुळे अश्या फसव्या जाहीरातीपासुन सावध राहणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. किंवा यासाठी 1962 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केला आहे.. चौकट _ महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना ही अतिशय महतकांक्षी योजना जाहीर केली आहे. माञ प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी ताबडतोब करावी ._ संजय पाटील, शेतकरी, कुसमोड.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















